डोक्यातील कोंडा हा सहसा टाळूशी संबंधित असला तरी तो भुवया, मिशा आणि नाक यासारख्या इतर भागातही दिसू शकतो! पण तुम्हाला माहीत आहे का की पापण्यांनाही कोंडा असतो? इतर भागांप्रमाणे, पापण्यांवरील कोंडा उघड्या डोळ्यांना क्वचितच दिसतो आणि उपचार न केल्यास काही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
लेन्स घालणाऱ्यांनी संसर्ग टाळण्यासाठी पापण्यांमध्ये कोंडा होण्याची विशेष काळजी घ्यावी. या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया. कारण अनेकांना याविषयी माहितीच नाहीये
हे अगदी सामान्य आहे आणि जास्त तेल उत्पादन किंवा बुरशीच्या वाढीमुळे होते. Seborrheic Dermatitis किंवा mite infestation (Demodex) सारख्या परिस्थितीमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. मात्र याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या आयलायनर आणि मस्करा लावून झोपण्याच्या सवयीमुळे तुमच्या पापण्यांमध्ये कोंडा होऊ शकतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी डोळ्यांवरील मेकअप काढणं अत्यंत गरजेचे आहे
पापण्यातील कोंडा स्पष्टपणे दिसत नसला तरी, पापण्यांना खाज सुटणे, लाल किंवा सुजलेल्या पापण्या, डोळ्यांमध्ये जळजळ होणे किंवा त्रास होणे आणि पापण्यांच्या तळाशी उग्र, खवले येणे यांचा समावेश होतो
पापण्यांच्या काठावर चकचकीत त्वचा किंवा तेलकट स्त्राव, भुरभुरलेल्या पापण्या, पापण्या सकाळी एकत्र चिकटून राहणे, खाज सुटणे किंवा जळणे, लाल, सुजलेल्या पापण्या, पाणी येणे यासारखे त्रासदेखील या आजाराचे संकेत आहेत, त्यामुळे वेळीच काळजी घ्यावी