लग्नसराईत परिधान करा 'या' डिझाइन्सचे सुंदर मोठे कानातले
मोराची डिझाईन असलेले कानातले सर्वच महिलांवर शोभून दिसतात.तसेच हल्ली बाजारात अनेक नवनवीन पद्धतीचे कानातले पाहायला मिळत आहे.
डिझायनर किंवा पार्टीवेअर साडी घातल्यानंतर त्यावर तुम्ही कुंदनचे दागिने परिधान करू शकता. या दागिन्यांमध्ये अनेक वेगवेगळे ऑपशन्स बाजारात उपलब्ध आहेत.
हुप डिझाइन्स असलेले कानातले कोणत्याही पेस्टल रंगाच्या साडीवर घातल्यास तुमचे कान भरलेले आणि उठावदार दिसतील. या कानातल्यांमुळे तुमच्या सौदंर्यात वाढ होईल.
सिल्क किंवा काठापदराची साडी नेसल्यानंतर साऊथ इंडियन पद्धतीचे कानातले अतिशय सुंदर दिसतात. साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने मोठ्या आकाराचे कानातले परिधान करावे.
पैठणी किंवा इतर कोणत्याही साडीवर सोन्याचे झुमके अतिशय सुंदर दिसतात. त्यामुळे तुमचा लुक अधिक उठावदार करण्यासाठी तुम्ही मोठ्या आकाराचे झुमके परिधान करू शकता.