लग्न सराईमध्ये गळ्यात खुलून दिसेल मोत्याची चिंचपेटी
काहींना गळ्यात जास्त दागिने घालायला आवडत नाही. त्यामुळे तुम्ही या पद्धतीची साधी चिंचपेटी परिधान करू शकता. नाजूक चिंचपेटी गळ्यात सुंदर दिसते.
पूर्वीच्या काळी चिंचपेटी फक्त मोत्याची बनवली जात होती. मात्र हल्ली यामध्ये अनेक बदल झाले आहेत. स्टोनवर्क केलेली चिंचपेटी परिधान करू शकता.
मोत्याची चिंचपेटी साडीवर अतिशय सुंदर दिसते. त्यामध्ये तुम्ही मोत्याची वेल असलेली चिंचपेटी घालू शकता. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारची चिंचपेटी परिधान करू शकता.
बाजारात नव्या डिझाइन्सचे अनेक नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तुम्ही हेवी दागिने म्हणून या डिझाइन्सची चिंचपेटी घालू शकता.
चिंचपेटीच्या अनेक नवनवीन डिझाइन्स बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही स्टोन वर्क केलेली किंवा पूर्णपणे मोत्याची चिंचपेटी खरेदी करू शकता.