हातावर मोकळा सोडलेला पदर या पद्धतीने करा फिक्स
साडी नेसल्यानंतर पदर डाव्या खांद्यावर घेतल्यानंतर सगळ्यात आधी तो खांद्यावर पिनअप करून घ्यावा.
पोटावर जिथे साडीच्या निऱ्या खोचलेल्या असतात तिथे पोटाच्या डाव्या बाजुला पदर अगदी हलकासा खोचून घ्यावा. ज्यामुळे पदर व्यवस्थित बसेल.
पदराचा खालचा काठ थोड्या थोड्या अंतरावर वर करून निऱ्या घातल्याप्रमाणे दोन ते तीन फोल्ड करून घ्यावे. यामुळे तुमचा पदर खाली येणार नाही.
पदराच्या निऱ्या डाव्या हाताच्या खांद्यांखालून पिनअप करून घ्यावा. ज्यामुळे तुम्ही साडीला लावलेला पिन दिसणार नाही.
वरील पद्धतीने जर पदर पिनअप केला तर तुमचा पदर खाली येणार नाही. तसेच पदर सांभाळताना तुमची तारांबळ उडणार नाही.