Handloom sarees च्या दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
हातमागाच्या साड्या कापसाच्या कव्हरमध्ये ठेवणे नेहमीच योग्य मानले जाते. यामुळे साडीची चमक जशीच्या तशीच राहते. साडीच्या धाग्यांना कोणतीही इजा पोहचत नाही. कापसाच्या कव्हरमध्ये साडी ठेवल्यास साड्यांना घाण आणि ओलाव्यापासून बचाव होतो.
हातमागावरील साडी दोन किंवा टिंडा वेळा घातल्यानंतर महिला साडी धुवतात. त्यामुळे साडी स्वच्छ करताना मिठाच्या पाण्याचा वापर करावा. काही वेळ मिठाच्या पाण्यात साडी भिजत ठेवावी. त्यानंतर साडी हलक्या हाताने धुवून घ्या.
हातमागावर विणण्यात आलेली साडी कायम सावलीच्या ठिकाणी सुकत घालावी. कडक उन्हात साडी अजिबात सुकवू नये. यामुळे साडीची चमक कमी होते आणि धागे निघून येतात.
साडी धुतल्यानंतर ती इस्त्री करताना कॉटनच्या कपड्यात गुंडाळून नंतरच इस्त्री करावी. यामुळे कापड कमकुवत होणार नाही. साडीवर सतत इस्त्री केल्यामुळे साडीचे घागे कमकुवत होतात.
साड्या कपाटात ठेवताना त्यात काही कडुलिंबाची पाने, कापूर किंवा नॅप्थालीनचे गोळे ठेवा. यामुळे साड्या खराब होणार नाहीत.