लग्नसराईत मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी नक्की ट्राय करा High Neck Blouse डिझाईन
शिफॉन किंवा कोणत्याही सिल्क साडीवर तुम्ही बंद गळ्याचे हाय व्ही नेक ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यावर गजरा हेअर स्टाईल अतिशय सुंदर दिसेल.
सध्या सगळीकडे कांजीवरम साडीची मोठी क्रेझ आहे. या साडीवर हाय व्ही नेक ब्लाऊज शिवून त्यावर आरी किंवा डायमंड वर्क केल्यास ब्लाऊजला मॉडर्न लुक येईल.
काठपदर साडीपासून ते अगदी रोजच्या वापरातील कॉटन साड्यांवर हाय व्ही नेक ब्लाऊज शोभून दिसेल. यामुळे साडीचा साधा लुकसुद्धा मॉर्डन दिसेल.
लग्नातील नऊवारी किंवा सहावारी साड्यांवर या डिझाईनचे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता. संपूर्ण ब्लाऊज बोटनेक पॅर्टनमध्ये शिवून घेऊ शकता.
हाय व्ही नेक ब्लाऊजवर अशा पद्धतीने केलेली भरगच्च डिझाईन साडीला शोभून दिसेल. साडीच्या काठावरील रंगात आरी वर्क केल्यास ब्लाऊजला वेगळा लुक येईल.
बोट नेक ब्लाऊजवर केलेले आरी वर्क साध्या साडीला सुद्धा मॉडर्न आणि पारंपरिक लुक देते. त्यामुळे हाय व्ही नेक ब्लाऊज नक्की ट्राय करून पहा.