Forehead Personality: कपाळावर दडली आहेत अनेक रहस्ये; तुमचं कपाळ सांगेल तुम्ही किती भाग्यवान आहात ते...
सामुद्रिक शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाचा आकार वेगळा असतो. एखाद्या व्यक्तीच्या कापाळाकडे पाहूनच त्याचा भविष्याचा आणि स्वभावाचा अंदाज लावू शकता
शास्त्रानुसार, ज्यांचे कपाळ रुंद आणि लहान असते ते जीवनात खूप प्रगती करतात. असे लोक तीक्ष्ण मनाचे असतात आणि त्यांना नियोजन करुन काम करायला फार आवडते. असे लोक शांत स्वभावाचे असतात आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते
ज्या लोकांचे कपाळ लहान असते, त्यांची बुद्धि फार वेगवान असते. ते कोणत्याही गोष्टीवर वेगवान प्रतिक्रिया देऊ शकतात. पण त्यांच्यात संयम अजिबात नसतो
लहान कपाळ असणाऱ्या लोकांना संघर्षाचा फार सामना करावा लागतो. त्यांना कामात लवकर यश मिळत नाही मात्र एकदा का ते यशस्वी झाले की ते आकाशाला स्पर्श करतात
तसेच ज्या लोकांचे कपाळ पुढे झुकलेले असते ते धार्मिक स्वाभावाचे असतात, त्यांना पूजा किंवा धार्मिक कार्यात फार रस असतो. अशा लोकांमध्ये आत्मविश्वास फार असतो आणि ते इतरांवर होणारा अन्याय पाहू शकत नाहीत