Turmeric Face Pack (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
एका छोट्या वाटीत एक चमचा मध घ्या. त्यात अर्धा चमचा हळद मिसळा आणि थोडे कच्चे दूध घालून गुळगुळीत पेस्ट बनवा. ज्यांची त्वचा जास्त तेलकट आहे, त्यांनी या मिश्रणात थोडी मुलतानी माती आणि गुलाबपाणी घालू शकतात.
मध त्वचेतील कोरडेपणा कमी करून चेहरा मऊ ठेवण्यास मदत करतो. हळदीतील नैसर्गिक गुण त्वचा स्वच्छ ठेवण्यास उपयोगी ठरतात. कच्च्या दुधातील लॅक्टिक अॅसिड मृत त्वचा हलक्या पद्धतीने दूर करण्यास मदत करते, त्यामुळे चेहरा अधिक फ्रेश दिसू शकतो.
कोणताही घरगुती उपाय थेट चेहऱ्यावर लावू नये. आधी कानामागे किंवा हाताच्या आतील भागावर थोडा फेसपॅक लावून 10 मिनिटे थांबा. त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा जळजळ जाणवली नाही, तरच तो चेहऱ्यावर वापरा.
फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर समान प्रमाणात लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. चेहरा धुतल्यावर लगेच मॉइश्चरायझर लावा. सुर्यकिरणामध्ये जात असाल तर तुम्हाला जी सुट होईल ती सनस्क्रीन नक्की लावा. त्यामुळे तुमचा चेहरा टॅन पडणार नाही.
हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्यास त्वचा अधिक स्वच्छ, तजेलदार आणि मऊ दिसण्यास मदत होऊ शकते. मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणतीही अॅलर्जी किंवा त्रास जाणवल्यास वापर थांबवून त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.