Maharashtra Governor Acharya Devvrat traveled on Tejas Express train for the oath ceremony.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचे राज्यपाल पद सोपवण्यात आले आहे. आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचे अतिरिक्त राज्यपाल पद सोपवण्यात आले असून त्यांच्या शपथविधी सोहळा झाला आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी विमानाचा वापर न करता रेल्वे सेवेचा वापर केला आहे. त्यांनी सपत्नीक दर्शना देवी यांच्यासह हा रेल्वे प्रवास केला. सामान्य लोकांसह त्यांनी हा प्रवास केला आहे.
अहमदाबादहून आचार्य देवव्रत हे तेजस एक्सप्रेसने मुंबईला रवाना झाले. काल ते तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करुन मुंबईमध्ये दाखल झाले. रेल्वे प्रवासामध्ये ते वर्तमानपत्र वाचताना दिसून आले.
आचार्य देवव्रत हे मुंबई रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांचे प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून संपूर्ण मान राखून स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
सोमवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजभवन, मुंबई येथे त्यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथविधी झाला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांची नियुक्ती त्यांच्या सध्याच्या कर्तव्यांव्यतिरिक्त त्यांची कामे पार पडण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडला असून यावेळी संपूर्ण शासकीय मानवंदना देत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी केलेला धोती लूक सर्वांचे लक्ष वेधत होता.
आचार्य देवव्रत मूळचे हरियाणाचे आहेत. त्यांचे जीवन आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांच्या शिकवणींनी प्रभावित आहे. रोहतकमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे गुजरातमधील प्रतिष्ठित विद्यापीठ गुजरात विद्यापीठाचे कुलपती देखील आहेत.