नाकात शोभून दिसतील 'या' डिझाईन्सच्या सुंदर नोजपिन्स
बाजारात ऑक्सिडाइज नोजरिंग्स उपलब्ध झाल्या आहेत. या नोजरिंग्स कोणत्याही कपड्यांवर अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात.
सणावाराच्या दिवसांमध्ये सर्वच नाकामध्ये नथ घालतात. पारंपरिक दागिना म्हणून नथीची सगळीकडे ओळख आहे. त्यामुळे मातृदिनानिमित्त आईला तुम्ही खास भेटवस्तू म्हणून नथ भेट देऊ शकता.
अनेक महिला नाकात फुली घालायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही या डिझाइन्सची नोजरिंग आईला भेट देऊ शकता. सोन्याची साधी सिंपल गोलाकार नथनी आईला खूप जास्त आवडेल.
गोलाकार नोजरिंग बनवताना डायमंड्सचा वापर केला जातो. काहींना डायमंडचे दागिने घालायला खूप आवडतात. त्यामुळे छोटीशी डायमंड नोजरिंग आईला भेटवस्तू म्हणून नक्की द्या.
नाकामध्ये सुंदर फुलांची नोजपिन्स अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते. याशिवाय नोजरिंग्स बनवताना त्यात वेगवेगळ्या रंगीत खड्यांचा वापर केला जातो.