काजूकतलीध्ये भेसळ आहे की नाही कसे ओळखायचे
दिवाळीमध्ये सोनपापडी, काजूकतली या मिठाईचा सर्वांत जास्त वापर केला जातो. मात्र काजूकतलीमध्ये मैदा वापरला आहे की नाही हे कसे ओळखावे ते जाणून घ्या
जर काजू कतली चांगल्या प्रतीची असेल, तर ती सहसा तोंडात विरघळते. तिचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात साखरेचे प्रमाण अतिरिक्त नसते. जर काजू कतली थोडी कडक, रबरासारखी लागत असेल किंवा तिला पिठाळ चव येत असेल, तर त्यात मैद्याची भेसळ असू शकते.
काजू कतलीचा रंग तपासा आणि तिचा एक तुकडा तोडून पाहा. जर ती पूर्णपणे पांढरी किंवा खूप पिवळी असेल, तर त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे. शिवाय, जर ती कोरडी वाटत असेल किंवा आतून पिठासारखी लागत असेल, तर तिचा दर्जा निकृष्ट असण्याची शक्यता आहे.
काजू कतलीवर चांदीचा वर्ख लावलेला असतो. मात्र, तो भेसळयुक्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्खाची गुणवत्ता तपासण्यासाठी तो बोटांनी हलकेच स्पर्श करून पाहा. अस्सल चांदीचा वर्ख अतिशय मऊ आणि पातळ असतो. वर्खाचा रंग खूप फिका किंवा असमान दिसत असल्यास त्याच्या गुणवत्तेबाबत शंका येऊ शकते.
काजू कतलीवर चांदीचा वर्ख लावलेला असतो. मात्र, हा वर्ख खरा आहे की भेसळयुक्त, हे तपासणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी वर्खाला बोटांनी हलकेच स्पर्श करून पाहा. अस्सल चांदीचा वर्ख अतिशय मऊ आणि पातळ असतो. तसेच, वर्खाचा रंग खूप फिका किंवा ठिकठिकाणी वेगळा दिसत असल्यास त्याच्या गुणवत्तेबाबत शंका येऊ शकते.