Tech Tips: स्क्रीन लॉक करूनही Youtube वरून ऐकू शकता तुमची आवडती गाणी! फक्त फॉलो करा ही ट्रिक
Youtube चा वापर जगभरात केला जातो. फ्रीमध्ये व्हिडीओ पाहण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी Youtube एक उत्तम पर्याय आहे.
Youtube ने त्यांच्या युजर्ससाठी अनेक वेगवेगळे फीचर्स सुरु केले आहेत. Youtube चे जगभरात करोडो युजर्स आहेत.
क्वालिटी अॅडजस्ट करण्यापासून रिपीट मोडमध्ये तेच गाणे पुन्हा पुन्हा ऐकण्यापर्यंत आणि व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करण्यापर्यंत Youtube वर सर्वकाही शक्य आहे.
आता आम्ही तुम्हाला एका Youtube ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही Youtube वरील गाणी स्क्रीन लॉक केल्यानंतर देखील ऐकू शकता.
सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये ब्राउजर ओपन करा. आता YouTube वर कोणतेही गाणं सर्च करा. आता गाणं प्ले करा आणि स्क्रीन लॉक करा. स्क्रीन लॉक केल्यानंतर गाणे थांबेल, परंतु लॉक स्क्रीनवरून थांबलेले गाणे तुम्ही पुन्हा प्ले करू शकता, यासाठी स्क्रिन अनलॉक करण्याची देखल गरज नाही.