Tech Tips: आता थेट WhatsApp Status वर शेअर करा Instagram Reels, ऑडियोही गायब होणार नाही! फक्त फॉलो करा ही स्टेप
सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये इंस्टाग्राम उघडा. यानंतर इंस्टाग्राम रील्स उघडा.
तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तुम्हाला कोणताही रील शेअर करायची असेल, तर त्याच्या तळाशी दिसणाऱ्या शेअर आयकॉनवर क्लिक करा.
आता तुम्हाला रील्सच्या खाली अनेक पर्याय दिसतील, ज्यामध्ये WhatsApp चे दोन पर्याय देखील असतील.
एका पर्यायात WhatsApp आणि दुसऱ्या पर्यायात WhatsApp Status उपलब्ध असेल. जर तुम्हाला इंस्टाग्राम रील्स व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर करायची असेल तर तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेटस पर्याय निवडावा लागेल.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ऑडिओसह इंस्टाग्राम रील दिसू लागेल.
हे फीचर त्यांच्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरणार आहे जे अनेकदा इंस्टाग्रामवर त्यांच्या रील्स तयार करतात.