Arattai Messaging App: Apple अॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला हा 'मेड-इन-इंडिया' मेसेजिंग अॅप, WhatsApp ला करणार का रिप्लेस?
गेल्या काही काळापासून मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप प्रत्येकाशी जोडलेला आहे. व्हॉट्सॲपचे करोडो युजर्स आहेत. व्हॉट्सॲपशिवाय जगण्याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. आपण छोट्या मोठ्या मेसेजसाठी व्हॉट्सॲपचा वापर करतो. कुटुंबासोबत बोलायचं असो नाही तर मित्रांसोबत, व्हॉट्सॲपशिवाय आपलं बोलणं अपूर्ण आहे. पण फक्त विचार करा एक दिवस असा आला की तुम्हाला व्हॉट्सॲपऐवजी दुसऱ्या ॲपचा वापर करावा लागला तर? व्हॉट्सॲप अचानक तुमच्या आयुष्यातून गायब झाले तर?
केवळ भारतात व्हॉट्सॲपचे 50 करोडोहून अधिक युजर्स आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की आता या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ‘मेड-इन-इंडिया’ मेसेजिंग ॲप देखील लाँच करण्यात आले आहे. जगभरात राज्य करणाऱ्या व्हॉट्सॲपला टक्कर देण्यासाठी Arattai नावाचे एक नवीन मेसेजिंग ॲप लाँच करण्यात आले आहे. एवढंच नाही तर हे मेसेजिंग ॲप Apple अॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला आहे. या नव्या अॅपने आता व्हॉट्सॲपला मागे टाकलं आहे. त्यामुळे नवं ॲप व्हॉट्सॲपची जागा घेणार का? हे नवं ॲप नक्की आहे तरी काय, त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे ॲप खरंच व्हॉट्सॲपची जागा घेणार आहे का, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर Zoho कंपनी द्वारे तयार करण्यात आलेले हे मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन ॲपचं नाव Arattai असं आहे. Arattai चा अर्थ तमिळ भाषेत ‘कॅजुअल चॅट’ असा होतो. हे ॲप रोजच्या जीवनातील वापरासाठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये टेक्स्ट मेसेजिंग, वॉइस आणि वीडियो कॉल्स, मीडिया शेयरिंग, स्टोरीज आणि चॅनल्स सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. एवढंच नाही ॲपमध्ये कॉल्ससाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देखील देण्यात आले आहे. हे फीचर अद्याप मेसेजेसमध्ये उपलब्ध नसले तरी, कंपनीचे म्हणणे आहे की ते लवकरच मेसेजेसमध्येही उपलब्ध होईल.
WhatsApp चे भारतात डीप नेटवर्क आहे आणि Arattai पूर्वी अनेक ॲप्सनी व्हॉट्सॲपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये Hike, Telegram आणि WeChat सारख्या प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. मात्र हे ॲप्स व्हॉट्सॲपला टक्कर देऊ शकले नाहीत. WhatsApp प्रत्येक स्मार्टफोन युजरच्या मनावर राज्य करत आहे. मात्र आता Arattai ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ॲपला ‘मेड-इन -इंडिया’ टॅग आणि सरकारी मंत्र्यांचा पाठिंबा त्याला एक वेगळी ओळख देत आहे.
WhatsApp प्रमाणेच Arattai मध्ये देखील अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहे. ज्यामध्ये मल्टी-डिवाइस सपोर्ट, डेस्कटॉप आणि अँड्रॉयड टीवीसाठी ॲप्स, स्टोरीज आणि चॅनल्स सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. याचा अर्थ ते फक्त चॅटिंगपुरते मर्यादित नाही तर एक छोटासा सोशल नेटवर्किंग अनुभव देखील देऊ शकते.