Google Pay मधून दरमहिना कापले जाते सबस्क्रिप्शन शुल्क? अशा प्रकारे बंद करा ऑटो-पे फीचर
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Pay ओपन करा.
आता टॉप-कॉर्नरवर दिसणाऱ्या प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करा. खाली स्क्रोल-डाउन केल्यानंतर तुम्हाला Auto Pay फीचर दिसेल.
Automatic Payments ऑप्शनमध्ये Live, Pending आणि Completed असे तीन ऑप्शन्स असतील.
जर ऑटोपेवर सबस्क्रिप्शन चालू असेल, तर तुम्हाला ते लाईव्ह विभागात दिसेल. जर पेमेंट प्रलंबित असेल, तर तुम्हाला ते पेंडिंग पर्यायावर दिसेल. जर एखाद्याचे सबस्क्रिप्शन किंवा पेमेंट पूर्ण झाले असेल, तर तुम्हाला ते Completed विभागात दिसेल.
जर तुम्हाला सबस्क्रिप्शन रद्द करायचे असेल किंवा मॅन्युअली पैसे द्यायचे असतील तर तुम्ही त्यासाठी लाईव्ह ऑटो पे फीचर देखील बंद करू शकता.
यासाठी तुम्हाला फक्त लाईव्ह सेक्शनमध्ये जावे लागेल आणि त्या सबस्क्रिप्शनवर जावे लागेल जे तुम्हाला बंद करायचं आहे. आता तिथे दिसणाऱ्या कॅन्सल पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे.