आयफाच्या ग्रीन कार्पेटवर चमकला माधुरी-कृतीचा हॉट लुक, करीना-शाहिद देखील दिसले खास अंदाजात (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री कृती सॅनन ऑफ-शोल्डर पांढऱ्या बॉडीकॉन गाऊनमध्ये बोल्डनेसचा स्पर्श जोडताना दिसली. तिच्या या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
शाहिद कपूरही आयफा अवॉर्ड्सच्या ग्रीन कार्पेटवर त्याच्या स्टायलिश लुकने चमकताना दिसला. त्याने निळ्या रंगाचा कोर्ट परिधान केला होता.
आयफाच्या ग्रीन कार्पेटवर गायिका श्रेया घोषाल पारंपारिक लूकमध्ये दिसली. यावेळी श्रेयाने हिरव्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसली.
यासोबतच, माधुरी दीक्षित तिच्या पती श्रीराम नेनेसोबत सहभागी होताना दिसली. काळ्या रंगाच्या गाऊन परिधान करून अभिनेत्री पतीसह मॅचिंग झाली होती.
तसेच, सोनेरी आणि लाल रंगाच्या ड्रेसमध्ये करीना कपूर खूपच सुंदर दिसत होती. अभिनेत्रींच्या लुकने सगळ्यांना चकित केले होते.
आयफा अवॉर्ड्सच्या ग्रीन कार्पेटवर विक्रांत मेस्सी पूर्णपणे काळ्या रंगाच्या लुकमध्ये दिसला. त्याच वेळी, करण जोहरने पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. करण पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसला.
अनोख्या फॅशनसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा तिची प्रतिभा दाखवत आयफा ग्रीन कार्पेटवर एका वेगळ्याच अंदाजात पोहोचली. ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.