वजन कमी करण्यासाठी 'या' भाज्यांचे करा सेवन
चवीला कडू असलेले कारले अनेकांना आवडत नाही. पण कारले आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहून वाढलेले वजन नियंत्रणात राहते.
कोबीचे सेवन केल्यामुळे लवकर भूक लागत नाही. शिवाय या भाजीमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर आढळून येते, ज्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. भाताला पर्याय म्हणून तुम्ही कोबीच्या भाजीच्या सेवन करू शकता.
विटामिन सी युक्त शिमला मिरचीचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय या भाजीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.
डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासोबतच वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा गाजर अतिशय प्रभावी आहे. गाजरमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे नियमित एक गाजर खावे.
वजन कमी करण्यासाठी पालकचे सेवन करावे. पालक खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. पालक पासून तुम्ही भाजी, पालक पनीर किंवा पालक स्मूदी सुद्धा बनवू शकता. पालक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.