Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठून कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. कढीपत्ता खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 05:30 AM
पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

Follow Us
Close
Follow Us:

वजन कमी करण्यासाठी उपाय?
कढीपत्ता खाण्याचे फायदे?
कढीपत्याचे सेवन कशा पद्धतीने करावे?

जगभरात आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांनी अनेक लोक त्रस्त आहेत. त्यातील अतिशय भयानक समस्या म्हणजे वाढलेले वजन. पोटावर वाढलेला चरबीचा घेर कितीही उपाय केले तरीसुद्धा लवकर कमी होत नाही. धावपळीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले वजन कमी करणे खूप कठीण होऊन जाते. सतत काम, मानसिक तणाव, कोणत्याही वेळी जेवण, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे पोटावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर चरबीचा घेर वाढू लागतो. पोटावर चरबीचा घेर वाढल्यानंतर थोडं चालल्यास लगेच दम लागतो. वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. काहीजण १० ते १५ दिवसांमध्ये वजन कमी करण्याच्या नांदात संपूर्ण आरोग्याचे नुकसान करून घेतात.(फोटो सौजन्य – istock)

शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स, प्रत्येक अवयव होईल मुळांपासून स्वच्छ

वजन कमी करण्यासाठी एक वेळ जेवणे, नाश्ता न करणे, वेगवेगळी सप्लिमेंट्स, तासनतास व्यायाम करणे यांसारख्या चुकीच्या गोष्टी फॉलो केल्यामुळे वजन कमी होत नाही, तर वजन आणखीनच वाढत जाते आणि शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवतात. जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा वाढतो आणि आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना कढीपत्त्याच्या पानांचे कशा पद्धतीने सेवन करावे? कढीपत्ता खाल्ल्यामुळे शरीराला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. महिनाभरात नियमित योग्य पद्धतीने डाएट फॉलो केल्यास शरीरात बदल दिसून येईल.

कढीपत्त्याच्या पानांचे फायदे:

कढीपत्त्याच्या पानांचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जेवणाच्या फोडणीमध्ये जर कढीपत्ता नसेल तर पदार्थाला व्यवस्थित चव लागत नाही. त्यामुळे जेवणात कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा. आयुर्वेदामध्ये कढीपत्त्याच्या पानांना खूप जास्त महत्व आहे. कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अल्कलॉईट शरीराची चरबी कमी करते आणि मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत करते. त्यामुळे आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.

कढीपत्याच्या पानांचा चहा:

अनेकांना कढीपत्त्याची पाने कच्ची खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी कढीपत्त्याच्या पानांचा चहा बनवून प्यावा. यासाठी टोपात एक ग्लास पाणी गरम करून त्यात कढीपत्याची पाने टाकून उकळी काढावी. टोपातील पाणी अर्धा होईपर्यंत पाण्याला उकळी काढून घ्या. त्यानंतर तयार केलेला चहा गाळून त्यात लिंबाचा रस टाका आणि सेवन करा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्याच्या पानांचा चहा प्यावा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल आणि आरोग्य सुधारेल.

किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा

पाने चावून खा:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्याची पाने चावून खावीत. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर स्वच्छ होईल. रिकाम्या पोटी ५ किंवा ६ पाने चावून खावीत. यामध्ये असलेले पोषक घटक लाळेसोबत शरीरात मिक्स होतात आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्याची पाने फायदेशीर ठरतात. तसेच कढीपत्याची पाने वाटून तुम्ही ताकामध्ये मिक्स करून पिऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जलद वजन कसे कमी करावे?

    Ans: दररोजच्या आहारातून ५००-८०० कॅलरीज कमी करा, प्रक्रिया केलेले अन्न, साखर, सोडा आणि तळलेले पदार्थ टाळा.

  • Que: वजन कमी करण्यासाठी काय खावे?

    Ans: फायबरयुक्त पदार्थ, दही, लसूण, ग्रीन टी आणि कोमट पाण्याचा आहारात समावेश करा.

  • Que: १ महिन्यात किती वजन कमी होऊ शकते?

    Ans: आहार आणि व्यायामाच्या योग्य नियोजनाने, निरोगी पद्धतीने दरमहा २-४ किलो वजन कमी केले जाऊ शकते.

Web Title: Regularly consume curry leaves to reduce stomach bloating numerous changes will be seen in the body within a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ
1

वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सब्जाचे सेवन, जाणून घ्या योग्य वेळ

राज्यात हेमोफिलिया रुग्णांकडे दुर्लक्ष! ५,५०० रुग्णांचे आयुष्य ‘क्लॉटिंग फॅक्टर’ वर रुग्णांना हवी आहे बजेटमध्ये भरीव तरतूद
2

राज्यात हेमोफिलिया रुग्णांकडे दुर्लक्ष! ५,५०० रुग्णांचे आयुष्य ‘क्लॉटिंग फॅक्टर’ वर रुग्णांना हवी आहे बजेटमध्ये भरीव तरतूद

अल्पदुग्ध मातांच्या ताणावर ‘सुरेल’ उपाय! कामा रुग्णालयात संगीत थेरपीच्या प्रयोगाने स्तनदुधात लक्षणीय वाढ
3

अल्पदुग्ध मातांच्या ताणावर ‘सुरेल’ उपाय! कामा रुग्णालयात संगीत थेरपीच्या प्रयोगाने स्तनदुधात लक्षणीय वाढ

‘हे’ ड्राय फ्रुट्स आहेत आरोग्यासाठी खजिना, नियमित सेवन केल्यास वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा राहाल फिट आणि तरुण
4

‘हे’ ड्राय फ्रुट्स आहेत आरोग्यासाठी खजिना, नियमित सेवन केल्यास वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा राहाल फिट आणि तरुण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.