स्वातंत्र्यदिन्याच्या दिवशी काढा 'या' सुंदर रांगोळी डिझाइन्स
भारताचा नकाशा काढून तुम्ही त्यात तिरंग्याचे रंग भरून सुंदर रांगोळी काढू शकता. तुम्ही काढलेली रांगोळी सगळ्यांना नक्की आवडेल.
कमीत कमी वेळात तुम्हाला जर सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढ्याची असेल तर तुम्ही तिरंगा काढून त्याच्या बाजूने वेगळी डिझाईन काढू शकता.
दाराभोवती किंवा अंगणाच्या आजूबाजूने काढण्यासाठी ही रांगोळी डिझाईन अगदी सुंदर आहे.
ठिपक्यांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये तिरंग्याचे रंग वापरून रांगोळी काढू शकता. ही रांगोळी काढण्यासाठी फार कमी वेळ लागतो.
१५ ऑगस्टच्या दिवशी तुम्ही मोराची डिझाईन काढून त्यात तुम्ही तिरंग्यातील रंग भरून सुंदर रांगोळी काढू शकता. ही रांगोळी तुम्ही तुमच्या अंगणात किंवा ऑफिसमध्ये काढू शकता.