'या' देशात जाऊन भारतीय बनू शकतात करोडपती; फेस्टिवल सेलनुसार जाण्याचं भाडं फक्त 11 रुपये
व्हिएतनाममध्ये भारतीय रुपयाची किंमत फार जास्त आहे. इथे एक भारतीय रुपयाची किंमत 299 व्हिएतनामी डोंगच्या बरोबरीला आहे. याचा अर्थ येथे तुम्ही कमी पैशात एक लग्झरी आयुष्य घालवू शकता
'हॅलोंग बे' हे व्हिएतनाम मधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे. हे अंदाजे 1,500 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. इथे 1,969 चुनखडीची बेटे आहेत जी 500 दशलक्ष वर्षांपूर्वीचा इतिहास दर्शवतात. हॅलोंग खाडीच्या गुहा पाहण्यासाठी लोक बोटी भाड्याने घेतात आणि या ठिकाणाला भेट देतात
'गोल्डन ब्रिज' हे व्हिएतनामच्या बा-ना हिल्सवर समुद्रसपाटीपासून 3,280 फूट उंचीवर आहे. या ठिकाणाचे वैशिष्य म्हणजे या पुलाचा रंग सोनेरी आहे आणि रचना वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली आहे. हा पूल 2018 मध्ये उघडण्यात आला, तो आज व्हिएतनाममधील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे
व्हिएतनामची संस्कृती आणि नैसर्गिक सौदर्य जवळून पाहायचे असल्यास तुम्ही हनोईपासून 135 किमी अंतरावर असलेल्या माई चाऊ गावाला नक्कीच भेट द्यायला हवी. तुम्ही येथील स्थानिक बाजारातून अनेक गोष्टी खरेदी करु शकता
आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हिएतजेट एअरने आता एक मजेदार फेस्टीव सेल सुरु केली आहे , ज्यानुसार तुम्ही केवळ 11 रुपयांमध्ये व्हिएतनामला भेट देऊ शकता. ही स्कीम इको क्लास तिकीटांना लागू होते
ही ऑफर एका बाजूच्या तिकीटावर उपलब्ध आहे. तुम्हाला या तिकीटावर कोणतेही टॅक्स भरण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, ही ऑफर फक्त 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे