Womens Day 2025: महिलांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत 'या' पदार्थांची नावं; ऐकूनच थक्क व्हाल
1889 साली सॅवॉयची राणी मार्गेरिटा हिने नेपल्सला भेट दिली. यावेळी तिने शहरातील सर्वात प्रसिद्ध पिझ्झा चाखण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी कॅपोडिमोंटेच्या रॉयल पॅलेसने पिझ्झाओलो राफेल एस्पोसिटोला राणीसाठी खास तीन पिझ्झा बनवण्याते काम दिले. या तीन पिझ्झापैंकी राणीला एक पिझ्झा फार आवडला आणि म्हणून त्या पिझ्झ्याला 'मार्गरिटा पिझ्झा' हे नाव देण्यात आले, जे आज जगभरात लोकप्रिय आहे
टेट्राझिनी ही एक फेमस अमेरीकन डिश आहे ज्याचे नाव प्रसिद्ध ऑपेरा गायिका सोप्रानो लुईसा टेट्राझिनी यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे
19's च्या दशकात फ्रान्समध्ये हॉटेल टॅटिन नावाचे हाॅटेल काही बहीणी मिळवून चालवत होत्या. यातील एक बहिण स्टेफनी टॅटिन हिच्याकडून चूकून एक अनोखी डिश तयार करण्यात आली ज्याचे नाव टार्ट टॅटिन असे ठेवण्यात आले
1879 मध्ये ऑस्ट्रेलियाचे गायका डेम नेली मेल्बा आजारी असल्याकारणाने, त्याला अन्न पचवण्यास त्रास होत होता. यावेळा शेफ ऑगस्टे एस्कोफियर यांनी एक खास टोस्ट तयार केला ज्याचे नाव 'मेल्बा टोस्ट' ठेवण्यात आले
लेडी केणी ही बंगालमधील एक फेमस मिठाई आहे. असे मानले जाते की, लाॅर्ड कॅनिंगच्या पत्नी लेडी शार्लोट कॅनिंग भारतात आल्या होत्या तेव्हा त्यांच्या नावावरुन भीम चंद्र नाग यांनी पदार्थाला लेडी केनी हे नाव दिले