गोल्डन बनारसी साडीमध्ये पुरस्कार सोहळ्यात पोहचली जन्नत झुबेर, लेटेस्ट फोटोवर टाका एक नजर (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
जन्नत झुबेरने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
अभिनेत्री जन्नत झुबेरने ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, 'आज तिला तिचा पहिला इन्फ्लुएन्सर पुरस्कार मिळाला आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री शिव प्रताप शुक्ला यांच्याकडून हा सन्मान मिळाल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. '
जन्नाज तिचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सोनेरी बनारसी साडी परिधान केली होती. तिच्या लूकने पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिच्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ केलं आहे.
पुरस्कार सोहळ्यात जन्नत झुबेरची आकर्षक शैलीने सर्वांचे मन जिंकले. तिने कार्यक्रमात स्वतःला अशा पद्धतीने सादर केले की सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले. या साध्या शैलीत जन्नत खूपच सुंदर दिसत होती.
या खास प्रसंगासाठी जन्नत झुबेरने सौम्य मेकअप केला होता. तिने तिचा लूक चोकर नेकलेस आणि कॉन्ट्रास्टिंग रंगांच्या कानातल्यांनी पूर्ण केला. तिच्या हेअरस्टाईलबद्दल बोलायचे झाले तर, व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये, तिने एक आकर्षक बन घातलेला दिसतो आहे.