Karun Nair: Karun Nair, who made Mumbai sweat, has a wife from 'this' religion, India has a population of less than one lakh.
भारतीय संघात आपले स्थान शोधत असलेला करुण नायर आता चर्चेत आला आहे. आयपीएल २०२५ मध्ये त्याने आपल्या खेळीने धमाल उडवली आहे. त्याच्या फलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
रविवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा परभव केला. पण तरी देखील सर्वांच्या तोंडी दिल्लीच्या करुण नायरच्या कामगिरीची चर्चा आहे.
दिल्लीकडून मुंबईविरुद्ध करुण नायरने ८९ धावांची धामकेदार खेळी केली. परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.अशा परिस्थितीत आता चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा होता आहे. त्याबद्दल माहिती करून घेऊ. त्याची पत्नी कोणत्या धर्माची आहे? ज्याची भारतात लोकसंख्या १ लाखांपेक्षा देखील कमी आहे.
करुण नायरने पारशी धर्मातील मुलीसोबत लग्न केले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सनाया टंकारीवाला असून नायरची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे.
भारतात पारशी धर्मीयांची संख्या खूपच कमी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात पारशी धर्माचे फक्त ५७२६४ लोक आहेत. करुण नायरची पत्नीही त्याच धर्माची आहे.
करुण अनेकदा त्याच्या पत्नीसोबत दिसून येतो. तथापि, त्याची सुंदर पत्नी क्वचितच कॅमेऱ्यासमोर येत असते. पण, दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.
करुण नायर आणि त्यांची पत्नी सनाया यांना दोन गोंडस मुले आहेत. नायर सध्या टीम इंडियामध्ये आपले स्थान शोधताना दिसत आहे. देशांतर्गत क्रिकेटनंतर आता तो आयपीएलमध्ये देखील चांगला खेळ करत आहे.