Photos: After Cheteshwar Pujara's retirement, these 3 Indian players are now preparing to say goodbye to cricket.
अजिंक्य रहाणे : मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे हा भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज मानला जातो. परंतु, २ वर्ष झाले तो आंतरराष्ट्रीय क्रिकेतपासून दूर आहे. त्याने १९५ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलंअ आहे.अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८४१४ धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे २०१८ नंतर एक देखील एकदिवसीय आणि टी २० सामना खेळलेला नाही. तसेच आता कसोटी संघात युवा खेळाडू चांगले खेळत असून त्याचे संघात परत येणे अवघड दिसत आहे.
अमित मिश्रा : भारताचा स्टार फिरकीपटू अमित मिश्रा याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली असून अद्याप त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. मात्र त्याचे भारतीय संघात पुनरगमन होणे शक्य असल्याचे दिसत नाही.
अमित मिश्राने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१७ मध्ये खेळला होता. त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये एकूण १५६ बळी टिपले आहेत. अमित मिश्राचे सध्याचे वय ४२ वर्ष असून अमित मिश्रा लवकरच निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.
करुण नायर : भारतीय खेळडू करुण नायरची देशातंर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरी बघून निवड समितीने त्याला इंग्लंड दौऱ्यावर पाठवले होते. पण त्याला आपली कामगिरी उंचावता आली नाही.तो टीकेचा धनी देखील झाला होता.
करुण नायर इंग्लंड विरूद्धच्या ४ कसोटी सामन्यांमध्ये खेळला होता. त्याला ८ डावांमध्ये केवळ २०५ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे आता निवड समिति नायरला पुन्हा संधी देण्याची शक्यता कमी दिसत आहे.