नवविवाहित महिलांसाठी करवा चौथसाठी खास मेहंदी डिझाइन
जर तुम्हाला सुटसुटीत मेहंदी हवी असेल तर फुलांची डिझाईन एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये तळहाताच्या मध्यभागी एक सुंदर फूल काढून त्याच्या आत मध्ये करवा चौथ असे लिहू शकता. त्याच्या भोवती हलक्या वेली आणि नक्षी काढता येऊ शकते. ही डिझाइन साधी, मोहक आणि स्टायलिश दिसते.
चाळणीतून चंद्राकडे पाहणाऱ्या स्त्रीचे डिझाइन काढू शकता. डिझाइनच्या भोवती लहान फुले आणि वेली काढल्याने मेहंदीचे सौंदर्य अधिक वाढेल. ज्या महिलांना आपल्या हातांवर करवा चौथच्या विधीचे प्रतीक हवे आहे, त्यांना हे डिझाइन आवडू शकते.
करवा चौथसाठी पूजेचे ताट, करवा आणि दिवे असलेले डिझाइनदेखील काढता येऊ शकते. तुम्ही तुमच्या तळहाताच्या मध्यभागी पूजा करणाऱ्या स्त्रीचे चित्र काढू शकता. ज्या महिलांना हलकी मेहंदी आवडते, त्या करवा, दिवे, फुले आणि पाने असलेले डिझाइन निवडू शकतात.
तुम्ही मेहंदीच्या डिझाइनमध्ये पती पत्नीची डिझाइन काढू शकता. यामध्ये दोन्ही आकृती हातावर काढाव्यात. त्याच्या आजूबाजूला हृद्य, फूल, वेल इत्यादी डिझाइन्स काढता येऊ शकते.
गोल टिक्की किंवा मंडला मेहंदी डिझाइन नेहमीच आकर्षक दिसते. हाताच्या तळव्याच्या मध्यभागी गोलाकार नक्षी काढून त्याभोवती पाकळ्या, ठिपके आणि बारीक रेषा जोडल्या जातात. बोटांवरही छोटी नक्षी काढल्यास डिझाइन अधिक सुंदर दिसते. साधी पण उठावदार मेहंदी आवडणाऱ्या महिलांसाठी हा चांगला पर्याय आहे.