सुस्थितीत असलेल्या बसेस द्या अन्यथा काम बंद करू, केडीएमटी चालकांचा इशारा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. या बसेसविषयी ड्रायव्हर कंडक्टरनीदेखील नाराजी व्यक्त करणं सुरू केले आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर आणू नका अन्यथा आंदोलन करू, असा इशारा केडीएमटी बस चालकांनी दिला आहे.