बादशाह-रफ्तार नाही, हा आहे भारतातील सर्वात श्रीमंत रॅपर! गाण्यांना मिळतात मिलियन व्यूज, ओळखलं का?
तरूणांमध्ये रॅपची मोठी क्रेझ आहे. बादशाह - रफ्तार यांसोबतच आणखी असा एक रॅपर आहे, जो 90 च्या दशकांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आम्ही बोलत आहोत यो यो हनी सिंगबद्दल.
बादशाह - रफ्तार आणि हनी सिंगच्या रॅप्सना लोकांची चांगलीच पसंती मिळते. पण एक असा रॅपर आहे, जो सर्वात श्रीमंत आहे आणि त्याच्या हटके रॅपर्सनी लोकांची मन जिंकत आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत रॅपर यो यो हनी सिंग आहे. यो यो हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंग आहे. हनी सिंग एक गायक तसेच प्रोड्यूसर देखील आहे. संगीताच्या जगात त्याच्या आवाजाची एक अनोखी जादू आहे.
यो यो हनी सिंग हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक आहे. कोइमोईच्या अहवालानुसार, यो यो हनी सिंग 25 मिलियन डॉलर म्हणजेच 217 करोड रुपयांचा मालक आहेत.
तो त्याच्या एका गाण्यासाठी सुमारे 70 लाख रुपये घेतो. त्याचे मासिक उत्पन्न 1 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या गायकांमध्ये हनी सिंगचे नाव समाविष्ट आहे. रिपोर्ट्सनुसार, रॅपर बादशाहची एकूण संपत्ती 124 कोटी रुपये आहे.