अशाप्रकारे घरातील प्रत्येक मुलाला शिकवा Good Touch, Bad Touch!
विश्वासाचं वातावरण निर्माण करावं - मुलांसाठी त्यांच्या विश्वासच माणूस फार महत्त्वाचं असतं. अशावेळी पालकांनी आपल्या मुलाच्या मनात एक विश्वासाची जागा निर्माण करायला हवी
मुलांना शिकवा स्पर्श ज्ञान - मुलांना त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच Good Touch, Bad Touch शिकवायला हवे. चिमुकल्यांना बहुदा तुम्ही काय बोलता हे कळणार नाही. पण अशावेळी त्यांना स्पर्श ज्ञानाने यामधील फरक अधोरेखित करता येऊ शकतो
गोष्टी किंवा चित्राच्या रुपात समजवा - अनेकदा ज्या गोष्टी तोंडाने सांगून कळत नाहीत त्या चित्रांद्वारे अधिक सहजतेने समजतात. अशात तुम्ही चित्रांच्या मदतीने तुमच्या मुलांना Good Touch, Bad Touch चे प्रशिक्षण देऊ शकता. यावरून तुम्हाला नक्की काय सांगायचे आहे, ते त्यांना कळू शकेल
पर्सनल बाऊन्ड्रिज - पालकांनी आपल्या मुलांना खासगी मर्यादेचे शिक्षण देणे गरजेचे आहे. यामुळे कोणतीही चुकीची परिस्थिती ओढवल्यास मुलं थेट नाही बोलू शकतात. मुलांनी इतरांशी खेळताना अंगाशी मस्ती करु नये, तसेच उगाच कुणाच्या अंगावर बसू नये, अनोळखी व्यक्तीशी थोड लांबूनच बोलावे अशा गोष्टी तुम्ही त्यांना शिकवू शकता
मोकळेपणाने बोलायला शिकवा - मुलांना आपले मत मोकळेपणाने मांडायला शिकवा. तसेच त्यांच्यासोबत कोणती चुकीची गोष्ट घडत असेल तर त्याविरोधात बोलायला शिकवा. कोणत्याही अनोखळी माणसावर लगेच विश्वास ठेवणे किती घातक ठरू याचे पुरेपूर ज्ञान त्यांना द्या
रोजचे संभाषण - पालकांनी आपल्या मुलांना रोज न चुकता त्यांचा दिवस कसा गेला, त्यांनी दिवसभर काय केले, कोण भेटलं, याविषयी त्यांच्याशी संभाषण साधायला हवे. असे केल्याने मुलं पालकांसोबत मोकळे होतात आणि मोकळेपणाने आपले मत मांडतात.