उपयुक्त Tech Tips, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ठरतील फायद्याच्या! जाणून घ्या
हेडफोन कप - जर तुमचे हेडफोन कानात नीट बसत नसेल तर हेडफोन बदलण्याऐवजी त्यांचे कप बदला. ज्यामुळे तुम्हाला नवीन हेडफोन खरेदी करण्याची गरज भासणार नाही.
चार्जरच्या केबल - चार्जरच्या केबलला वाकण्यापासून आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी, तुम्ही त्यात बॉलपेन स्प्रिंग वापरू शकता. ज्यामुळे चार्जर केबल दिर्घकाळासाठी वापरली जाऊ शकते.
सेल्फी टीप - जर तुम्हाला सेल्फी घ्यायचा असेल, तर फोनचा कॅमेरा चालू केल्यानंतर, तुम्ही हेडफोनच्या व्हॉल्यूम रॉकर बटणाने फोटो क्लिक करू शकता. या पद्धतीमुळे सेल्फी अधिक चांगला येतो.
कॅसेट कव्हर - तुमच्याकडे जुने कॅसेट कव्हर असेल तर तुम्ही ते फोन स्टँडमध्ये बनवू शकता. ज्यामुळे तुमचा फोन कुठे पडण्याची किंवा हरवण्याची चिंता संपेल.
क्रेडिट कार्ड - तुमच्याकडे जुने एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा तुम्ही फोन स्टँड म्हणून वापर करू शकता.
प्लास्टिक ग्लास - जुने प्लास्टिकचे ग्लासेसचा वापर फोन स्पीकर म्हणून केला जाऊ शकतो.
फोन स्टँड - जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या पर्सला फोन स्टँड देखील बनवू शकता. किंवा तुम्ही हेअर पिन फोनच्या मागच्या बाजूला ठेवून स्टँड म्हणून वापरू शकता.