'ही' झाडे घरात लावल्यास बदलून जाईल जीवन
घर सजवताना तुम्ही घरात पर्पल हार्ट ही एक अतिशय सुंदर वनस्पती आणून लावू शकता. या वनस्पतीची जांभळी पाने केवळ घराचे सौंदर्यच नाहीतर मन शांत ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.
इनडोअर प्लांट म्हणून रबर प्लांटची सगळीकडे ओळख आहे. घरातील इंटेरियर करताना आवर्जून रबर प्लांट लावले जाते. ज्याची पाने मोठी आणि चमकदार असतात. घरात रबर प्लांट लावणे हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रमुख लक्षण मानले जाते.
घराच्या अंगणात किंवा घरात तुम्ही ड्रॅकेना वनस्पती लावू शकता. या वनस्पतीची पाने आकाराने मोठी असतात. ही वनस्पती वाईट नजरेपासून किंवा नकारात्मक उर्जेपासून घराचे रक्षण करते.
रोहियो वनस्पतीला 'मोसेस इन द क्रॅडल' असे सुद्धा म्हंटले जाते. या वनस्पतीची पाने वरून हिरवी आणि खालून जांभळी असतात. त्यामुळे घर सजवताना तुम्ही मोसेस इन द क्रॅडल ही वनस्पती लावू शकता.
सॉन्ग ऑफ इंडिया या वनस्पतीची पाने हिरव्या आणि पिवळ्या रंगात पट्टेदार असतात. घरामध्ये शीब आणि सकारात्मक उर्जेला ही वनस्पती आकर्षित करते.