पैठणी साडीवर काठ वर्षानुवर्षे नव्यासारखा ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
पैठणी किंवा काठपदर साडी नेसल्यानंतर अंगावर परफ्यूम मारला जातो, पण हाच परफ्यूम साडीवर मारल्यामुळे साडीचे काठ खराब होण्याची शक्यता असते. सिल्क साड्यांवर केमिकलयुक्त परफ्यूम मारणे चांगले नाही. यामुळे साडीची जर खराब होऊन जाते.
लाखो रुपयांची पैठणी साडी खरेदी केल्यानंतर ती घरात अजिबात धुवू नये. यामुळे साडीच्या धाग्यांना हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय साडी वारंवार रोलप्रेस किंवा ड्रायक्लिन करू नये.
कोणत्याही सणाच्या दिवशी पैठणी साडी नेसल्यानंतर ती लगेच कपाटात ठेवू नये. साडी पंख्याखाली हवेवर ठेवावी. यामुळे साडीमधील ओलावा कमी होतो आणि साडीचे काठ लवकर खराब होत नाही.
पैठणी साडी खरेदी केल्यानंतर किंवा नेसल्यानंतर प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये अजिबात ठेवू नका. साडी कायमच सुती कपड्याच्या बॅगमध्ये भरून ठेवावी. यामुळे साडीला हवा लागते.
वर्षानुवर्षे पैठणी साडी कायम टिकून राहण्यासाठी साडीला इतर साड्यांमध्ये अजिबात ठेवू नका. साडी कायमच सुती कपड्याच्या बँगमध्ये व्यवस्थित भरून ठेवावी.