स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी सतत हाय हील्स घालताय? जाणून घ्या पायांवर होणारे गंभीर दुष्परिणाम
उंच टाचेच्या चप्पल परिधान केल्ल्यामुळे कंबर आणि पाठदुखी वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पाठदुखीची समस्या वाढू लागल्यास स्नायूंवर तणावा येतो.
ऑफिसला जाताना किंवा वेळी कोणत्याही कार्यक्रमात हिल्स घातल्यानंतर पायांच्या हाडांवर, कंबरेच्या हाडावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेकदा पायांना फ्रॅक्चर सुद्धा होऊ शकते.
उच्च टाचेच्या चप्पला घातल्यामुळे पायांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. पायांमधील वेदना वाढून पायांच्या बोटांना त्रास होण्याची शक्यता असते.
तासनतास उंच टाचेच्या चप्पल घातल्यामुळे गुडघे दुखणे, पायांच्या टाचा दुखणे, पायांची बोटे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उंच चप्पलांमुळे गुडघ्यांवर ताण येतो.
पायांच्या बोटांमधील किंवा टाचांमधील वेदना वाढल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून पाय शिकवावे. यामुळे वेदना कमी होतील आणि आराम मिळेल.