'या' डिझाईनच्या हेअर अॅक्सेसरीज देतील केसांना सुंदर लुक
लहान आणि तोकड्या केसांवर कोणती हेअर स्टाईल करावी, हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही केस मोकळे सोडून मध्यभागी ब्रोच किंवा सुंदर हेअर पिन लावू शकता.
नऊवारी किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही चंद्रकोर असलेले हेअर पिन्स लावून सुंदर मोकळ्या केसांची हेअर स्टाईल करू शकता. मोकळ्या केसांमध्ये चंद्रकोर अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते.
रक्षाबंधन निमित्त डिझायनर साडी किंवा पांढऱ्या शुभ्र रंगाची साडी नेसल्यानंतर अंबाडा घालून त्यावर डायमंड वर्क असलेला हेअर ब्रोच लावू शकता. या डिझाईनचा हेअर ब्रोचची सगळीकडे मोठी क्रेझ आहे.
काहींना साडी किंवा ड्रेस घातल्यानंतर वेणी घालायला खूप जास्त आवडते. वेणी घातल्यानंतर वेणीच्या मध्यभागी अशा प्रकारची हेअर ज्वेलरी लावल्यास तुमचे केस उठावदार आणि सुंदर दिसतील.
गजरा, बीडेड पिन्स, झुमका स्टाईल क्लिप्स, कुंदन टिकली, फॅन्सी स्क्रंचीज, ब्रेड क्लिप्स आणि भरजरी हेडबँड्स, फ्रेंच रोल इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर स्टाईल केल्यानंतर तुम्ही केसांमध्ये गजरा माळू शकता. गजरा घातल्यामुळे केसांची शोभा वाढते आणि केस सुंदर दिसू लागतात.