गणेशभक्तांची मुंबईतील श्रध्दास्थाने (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईच नव्हे तर जगभरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिराची उभारणी ही 1801 मध्ये झाली. दररोज लाखो भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात.
प्रसिध्द जोगेश्वरी लेण्यांमध्ये हे गणेश मंदिर आहे. हे मंदिर शिल्पसौंदर्याचा एक उत्तम नमुना. गणरायाची मूर्ती दगडात कोरली आहे आणि त्यावर शेंदुराचा लेप आहे. ही दक्षिणाभिमुख मूर्ती आहे.
गिरगावातील फडकेवाडीत हे गणेश मंदिर असून 1890 मध्ये यशोदा गोविंद फडके यांनी हे मंदिर बांधले. पतीच्या अकाली निधनाने निपुत्रिक राहिलेल्या यशोदाबाईंनी गणेशालाच आपले पुत्र मानून येथे मंदिराची उभारणी केली.
बोरिवली पश्चिमेकडील वझिरा नाका येथील स्वयंभू गणेशाचे हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिरात पूर्वी कोळी, भंडारी आणि स्थानिक ग्रामस्थ येत. काही दशकांपासून बोरिवलीच नव्हे तर मुंबईतील गणेशभक्त दर्शनासाठी येतात. या ठिकाणी विविध देवतांची पाच मंदिरे आहेत.
धारावीतील हे गणेश मंदिर 1913 मध्ये दक्षिण भारतीय समाजाने बांधले. पुर्वी हे मंदिर पिंपळवृक्षाच्या खाली बांधण्यात आले त्यांनतर 1939 मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला गेला. धारावीवासियांचे हे श्रध्दास्थान आहे.