आषाढीच्या निमित्ताने बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) व बकरी ईद (Bakri Eid) एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील (Aurangabad) प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने दोन दिवस मांस विक्री बंद निर्णय घेतला आहे. मुस्लिम बांधवांच्या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.