भारताचा तो रहस्यमय तलाव, जिथे जो पण गेला तो पुन्हा परतला नाही... जाणून घ्या Lake of No Return ची रंजक कहाणी
या रहस्यमयी तलावाचे नाव नवांग यांग तलाव असे आहे. याला नो रिटर्न लेक असेही म्हटले जाते. हे तलाव अरुणाचल प्रदेशात वसले असून याच्या कथा लोकांना फार आश्चर्यचकित करतात. या तलावात वाईट शक्तींचा वास असल्याचे सांगितले जाते
या तलावाबाबत असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर, एका अमेरीकन विमानाच्या पायलटने सपाट जमीन समजून इथे एमरजंसी लँडींग केली. मात्र ते विमान या ठिकाणी रहस्यमयरीत्या गायब झाले
या तलावाबद्दल असेही म्हटले जाते की, युद्ध संपल्यानंतर जपानी सैनिक परत येत होते, परंतु तलावाजवळ पोहोचताच ते सर्व आपला मार्ग विसरले आणि अचानक गायब झाले
स्थानिकांचा तर असाही विश्वास आहे की, त्या सैनिकांना मलेरिया होता, ज्यामुळे ते सर्व मरण पावले. तथापि हे खरं आहे की खोटं याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही
या तलावाला भेट देण्यासाठी आजही लोक दूरदूरवरुन इथे येतात, मात्र तलावाच्या आत जाण्याचे धाडस आजवर कुणाला झाले नाही. या तलावाचे रहस्य उलगडण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले मात्र ते सर्व अयशस्वा ठरले