Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

मिजोरमची राजधानी आयझॉल ही भारतातील ‘सायलंट सिटी’ म्हणून ओळखली जाते. इथली शिस्तबद्ध वाहतूक, कमी हॉर्न आणि निसर्गरम्य डोंगररांगा पर्यटकांना शांत आणि निवांत सुट्टीचा अनुभव देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 14, 2026 | 08:24 AM
भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो... कसे राहतात लोक?

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो... कसे राहतात लोक?

Follow Us
Follow Us:
  • गर्दी, ट्राफिकपासून दूर कुठे फिरायला जायचं तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
  • मिजोरममध्ये वसलेलं हे ठिकाण देशातील सायलंट सिटी म्हणून ओळखलं जात.
  • इथे कसं जायचं ते जाणून घ्या.
शांत आणि निवांत सुट्ट्या घालवायच्या असतील तर गर्दी, ट्रॅफिक आणि सतत वाजणाऱ्या हॉर्नपासून दूर जाणं गरजेचं ठरतं. दिल्ली, मुंबई किंवा बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये तासनतास लागणारे ट्रॅफिक जाम आणि गोंगाट यामुळे सुट्टीचा मूडच खराब होतो. अशा वेळी जर तुम्ही खऱ्या अर्थाने शांततेचा अनुभव घ्यायचा विचार करत असाल, तर आयझॉल हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मिजोरमची राजधानी असलेलं हे शहर आपल्या शिस्तबद्ध वाहतूक संस्कृतीमुळे देशभरात वेगळं ओळखलं जातं.

भारताच्या या शहराला म्हटले जाते चॉकलेट सिटी; 99% लोकांना माहिती नाही याच नाव…

भारतातील ‘सायलंट सिटी’

आयझॉलला भारतातील सायलेंट सिटी म्हटलं जातं. याचा अर्थ इथले लोक बोलत नाहीत असा नाही, तर इथल्या वाहतुकीत अनावश्यक हॉर्न, आरडाओरडा किंवा गोंधळ जवळजवळ दिसत नाही. ट्रॅफिक जरी असलं तरी लोक संयमाने आणि नियम पाळून वाहन चालवतात. जाममध्ये अडकूनही कुणीही अधीर होत नाही.

लँड ऑफ हायलँडर्स

डोंगररांगा आणि हिरव्यागार दऱ्यांनी वेढलेलं आयझॉल समुद्रसपाटीपासून सुमारे 1132 मीटर उंचीवर वसलेलं आहे. स्वच्छ हवा, कमी प्रदूषण आणि निसर्गरम्य दृश्यांमुळे या शहराला ‘लँड ऑफ हायलँडर्स’ अशीही ओळख आहे. शहरातील कुठल्याही ठिकाणी उभं राहिलं तरी डोंगरांची मोहक रांग मन शांत करते.

शिकण्यासारखी वाहतूक शिस्त

इथले लोक नेहमी आपापल्या लेनमध्येच वाहन चालवतात. ओव्हरटेक करण्याची घाई किंवा स्पर्धा दिसत नाही. हॉर्न वाजवणं इथे अशिष्टपणाचं लक्षण मानलं जातं. पीक अवर्समध्येही लोक परस्परांचा आदर राखून शांततेत वाहन चालवतात.
दोनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र लेन चिन्हांकित केलेल्या आहेत. उजवी आणि डावी लेन वेगळ्या दाखवण्यासाठी मोठे डिव्हायडर नसले तरी पांढऱ्या रेषांनी स्पष्ट विभागणी केलेली आहे. एखाद्याला पुढे जायचं असल्यास हलकीशी बीप देऊन संकेत दिला जातो आणि शक्य असल्यास समोरील वाहन त्याला मार्ग देते.

ट्रॅफिक सिग्नलशिवायही शिस्त

या शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल नाहीत. तरीही वाहतूक सुरळीत सुरू असते. नियम पाळणं आणि संयम राखणं हीच इथली खरी ताकद आहे.

आयझॉलमधील पर्यटनस्थळे

आयझॉलमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. Solomon’s Temple हे भव्य मंदिर, Mizoram State Museum आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणारा बारा बाजार पर्यटकांना आकर्षित करतो. तसेच आयझॉलपासून सुमारे 10 किमी अंतरावर असलेलं Reiek हे छोटंसं पण अतिशय सुंदर गाव निसर्गप्रेमींसाठी खास ठिकाण आहे.

कमी खर्चात हनिमून ट्रिप प्लॅन करायची? तर भारतातील ही ऑफबीट डेस्टिनेशन ठरतील परफेक्ट

आयझॉलला कसे पोहोचाल?

  • रेल्वेने जायचं असल्यास थेट आयझॉलसाठी ट्रेन उपलब्ध नाही. जवळचं मोठं रेल्वे स्थानक म्हणजे Silchar. तिथून टॅक्सी किंवा कॅबने आयझॉल गाठता येतं.
  • हवाईमार्गे प्रवास करायचा असल्यास Lengpui Airport येथे देशातील काही प्रमुख शहरांतून थेट उड्डाणे उपलब्ध आहेत.
  • शांत, स्वच्छ आणि शिस्तबद्ध जीवनशैली अनुभवायची असेल, तर आयझॉलची सफर नक्कीच तुमच्यासाठी संस्मरणीय ठरेल.

Web Title: Aizawl is the silent city of india travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:23 AM

Topics:  

  • lifestyle news
  • Mumbai
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था
1

Mira Bhayandar News: वाहने खरेदी केली, वापर विसरले? मिरा-भाईंदर महापालिकेचा अजब कारभार; घोडबंदर डेपोत घंटागाड्यांची दुरवस्था

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी
2

ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
3

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
4

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.