Naagin 7 Ekta kapoor show next season these 5 actors can play lead role
'मॅडम सर' आणि 'गुम है किसी के प्यार में' सारख्या दोन सुपरहिट शोचा भाग राहिलेली भाविका शर्मा आता एका नवीन आणि काही तरी हटके व्यक्तिरेखेच्या शोधात आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकणारी भाविका एकता कपूरच्या 'नागिन ७'मध्ये मुख्य भूमिका साकारू शकते.
अलिकडेच, येशा रुघानीचा 'रब से है दुआ' हा शो ऑफ एअर झाला. या शोमध्ये तिने धीरज धूपरसोबत स्क्रीन शेअर केली होती. आता त्यानंतर येशा एका आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात आहे आणि तिच्यात कलर्सच्या 'नागिन'मध्ये हवे असणारे सर्व गुण आहेत.
'उडारियां' या टीव्ही मालिकेत आपल्या निरागसतेने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी ट्विंकल अरोरा, जर तिला नागिनसाठी कास्ट करण्यात आले तर ती नागिनच्या भूमिकेत आपल्या दमदार अभिनयाने नाविन्यता आणण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री शिवांगी जोशी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनाही आहे. 'नागिन' मालिकेत तुम्ही अनेकदा नागिनला नाचतानाही पाहिले असेल. याचा अर्थ असा की या पात्रासाठी फक्त अभिनयच नाही तर डान्स करता येणंही आवश्यक आहे. म्हणूनच नृत्य आणि अभिनयाचा परिपूर्ण मिलाफ असलेली शिवांगी जोशी या शोच्या मुख्य भूमिकेसाठी उत्तम असू शकते.
एमटीव्हीची प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'कैसी ये यारियां' मधून स्वतःची खास ओळख निर्माण करणारी नीति टेलर एक चांगली 'नागिन' देखील बनू शकते. तिचे अभिनय कौशल्य आणि सौंदर्य तिला नागिनच्या भूमिकेत एक वेगळी ओळख देऊ शकते.