‘है इंडिया तेरे साथ…’, ‘चांद्रयान 3’साठी तयार करण्यात आलं Anthem Song
इस्रोचं (ISRO) ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan 3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. भारतातील नागरिक या ऐतिहासिक क्षणाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच नॅशनल जिओग्राफिक (National Geographic Channel) या चॅनलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक अँथम साँग (Special Anthem) शेअर करण्यात आलं आहे. नॅशनल जिओग्राफिकने चांद्रयान 3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगसाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि ISRO मधील शास्त्रज्ञांना सलाम करण्यासाठी है इंडिया तेरे साथ या विशेष अँथम साँगची (Anthem Song) निर्मिती केली आहे.