ब्लॅक पँथरच्या टीझरमध्ये झळकला भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा
मार्वल स्टुडिओजच्या (Marvel Studios) ‘ब्लॅक पँथर’ सिनेमाच्या दुसऱ्या भागाची (Black Panther 2) सगळेजण वाट बघत होते. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर फक्त भारतीयांनीच नाही तर जगभरातील क्रीडारसिकांनी नीरजला अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता एका बिग बजेट हॉलिवूड सिनेमाच्या टीझरमध्ये नीरज दिसल्यामुळे भारतीय चाहते आणखीच आनंदी झाले आहेत. ‘ब्लॅक पॅंथर २’ सिनेमा ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.