मनीष मल्होत्राच्या पार्टीत नीता अंबानींचा रॉयल लुक! १५ कोटीच्या बॅगने वेधले साऱ्यांचे लक्ष
डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये नीता अंबानी यांनी सिल्व्हर सिक्विन साडी परिधान केली होती. ही साडी मनीष मल्होत्रा यांनीच डिझाईन केली आहे. या साडीवर गुंतागुंतीचे शेवरॉन डिटेलिंग करण्यात आले आहे.
सिल्व्हर सिक्विन साडीवर त्यांनी हृदयाच्या आकाराचे कोलंबियन पन्ना कानातले, हिऱ्यांचे ब्रेसलेट घातले आहे. हिरव्या रंगाचे पन्ना कानातले साडीवर अतिशय उठावदार दिसत आहे.
नीता अंबानींच्या हातातील बॅगची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे. त्यांनी हातामध्ये एडिशन हर्मीस मिनी बर्किन बॅग घेतली आहे. या बॅगवर हिऱ्याचे बारीक नक्षीकाम करण्यात आले आहे.
सॅक बिजौ बिर्किन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्सची किंमत अंदाजे ₹१५ कोटी असून त्यावर २,७१२ हिरे जडवलेले आहेत.ही एक दुर्मिळ आणि सगळ्यात महागडी बॅग आहे.
नीता अंबानी यांची बॅग गुलाबी सोन्यापासून बनवण्यात आली आहे. २०१२ मध्ये फ्रेंच लक्झरी ब्रँडच्या हौट बिजौटेरी कलेक्शनचा भाग म्हणून हर्मेस फाइन ज्वेलरीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर पियरे हार्डी हिरे जाडीत बॅग डिझाईन केली आहे.