पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यातील काही खास क्षण - फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाऊंट
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करण्यासाठी सीन नदीवरून तयार करण्यात आलेल्या पुलावर सुंदर असे तीन रंगाचे फ्लेम उडवण्यात आले ते पाहायला अतिशय दिसायला सुंदर दिसत होते.
अमेरिकेची गायक आणि अभिनेत्री लेडी गागाने तिच्या लुकने आणि तिच्या परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकली आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले.
मौलिन रुजमधील या सोहळ्याला ८० कलाकारांनी १८२० मधील विशेष डान्स सादर केला. त्याचबरोबर त्यांच्या वेशाभूषेने सुद्धा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले.
अद्भुत ऑलिम्पिक सोहळ्याला कॅनडाची गायक सेलिन डायन हिने तिच्या लूकने आणि गायकीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
यंदा भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत, या उद्घाटन सोहळ्याला भारतीय खेळाडू विशेष वेशभूषेत पाहायला मिळाले.
ऑलिम्पिकचे यजमानपद भूषावणाऱ्या फ्रान्सने यंदा खेळाडूंनी मोठी तुकडी पाठवली आहे. फ्रान्सचे खेळाडू नदीमधून प्रवेश करताना ड्रोनचे दृष्य कॅमेरामध्ये टिपण्यात आले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक विशेष व्यक्ती होती त्याने त्याच्या तोंडावर काळ्या रंगाचा कपडा लावला होता, त्याचबरोबर त्याने त्याच्या हातामध्ये ऑलिम्पिक फ्लेम हातामधे पकडली होती. ही रहस्यमय व्यक्ती कोण होती त्याचा खुलासा करण्यात आला नाही.