पंतप्रधान मोदींनी शाळेतील मुलींसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण (फोटो सौजन्य - Narendra Modi X account )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा रक्षाबंधनाचा सण शाळकरी मुलींसोबत साजरा केला.
यावेळी शाळकरी मुलींनी पंतप्रधान मोदींच्या हाती आनंदाने राख्या बांधल्या.
यातील एका राखीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींचा फोटो आहे.
या राखीत मोदी यांची दिवंगत आई यांचा फोटो असून, मोदी हे आपल्या मातोश्रींचे पाय धूत असल्याचा फोटो देखील आहे.
या राखीमध्ये एक झाड आईच्या नावे हा संदेशही लिहिण्यात आला आहे.
शाळकरी मुलींनी राखी बांधल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना आशिर्वाद दिले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी शाळकरी मुलांसोबत आनंदाने गप्पा मारल्या.