हा आहे भारतातील सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅक, खिडकीतून बाहेर पाहताच उडेल थरकाप
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वे मार्गाची एकूण लांबी 1,26,366 किलोमीटर आहे.
तुम्हाला माहीत आहे का भारतातील सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅक कोणता आहे? कमजोर हृदय असलेल्यांनी या ट्रॅकवरून जाणे टाळावे, असे सांगितले जाते.
चेन्नई आणि रामेश्वरमला जोडणारा चेन्नई रामेश्वरम रेल्वे ट्रॅक जगातील सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅकपैकी एक आहे. हा 2.3 किलोमीटर लांबीचा ट्रॅक हिंदी महासागरावर बांधला गेला आहे. या पुलावरून जेव्हा ट्रेन जाते तेव्हा प्रवाशांना समुद्राच्या लाटा अगदी जवळून पाहता येतात.
चेन्नई आणि रामेश्वरमला जोडणाऱ्या या रेल्वे ट्रॅकला पवन ब्रिज म्हणतात. हा ट्रॅक 1914 मध्ये बांधण्यात आला होता. तामिळनाडूच्या रामेश्वरम बेटाला मुख्य भूभागाशी जोडणारा पंबन पूल हा देशातील पहिला सागरी पूल आहे.
समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यावर हा रेल्वे मार्ग अधिक धोकादायक बनतो. अशावेळी, या रेल्वे मार्गावरून रेल्वेची वाहतूक बंद केली जाते. येथील हवामान आणि जोरदार वारे यामुळे हा रेल्वे मार्ग धोकादायक बनला आहे.
या ट्रॅकवर प्रवास करणे हा एक रोमांचक अनुभव आहे, जिथे प्रवासी केवळ विलोभनीय दृश्येच पाहू शकत नाहीत तर साहसाचा एक वेगळा अनुभवही घेऊ शकतात.