रेखा आणि तिच्या साड्या हे न संपणारं प्रेम आहे आणि पुन्हा एकदा डिझाईनर मनिष मल्होत्राने रेखाचे क्लासी साडीतील फोटो शेअर केले आहेत. पहा रेखाचा हा कमालीचा आकर्षक लुक
रेखाने सिल्व्हर गोल्ड रंगाची विंटेज साडी नेसली आहे आणि त्यासह तिने हँडव्होवन सिल्व्हर टिश्यू झरीचा चोला उजव्या बाजूला घेतला आहे. तिचा हा लुक पाहून कोणाचीही नजर हटणार नाही
यासह रेखाने त्याच रंगाचा बटवा कॅरी केला आहे आणि गोल्डन एम्ब्रॉयडरी त्यावर कोरण्यात आली आहे. रेखा नेहमीच साडीसह योग्य मॅचिंग पोटली घेताना दिसून येते
रेखाने यासह गोल्डन सिल्व्हर कॉम्बिनेशन असणाऱ्या बांगड्या आणि मोठे कानातले परिधान केले आहेत, जे तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत आहेत
नेहमीप्रमाणे केसांचा अंबाडा रेखाने घातला असून भांग पाडत त्यात लालभडक सिंदूर भरले आहे आणि तिचा हा लुक अधिक क्लासी बनवलाय
रेखाने या साडीसह बोल्ड मेकअप केला असून डार्क फाऊंडेशन, कन्सिलर, काजळ, डार्क लायनर, ब्राऊन डार्क आयशॅडो आणि भुवयाही दाट कोरल्या आहेत. याशिवाय तिने डार्क मरून रंगाची लिपस्टिक लावत आपला लुक पूर्ण केलाय