सई नेहमीच क्लासी लुक्समध्ये दिसते. तिचा हा लुक क्लासी असून अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. सईने यावेळी फ्लोरल लुक निवडला आहे
सईने व्हाईट ड्रेस घातला असून त्यावर फ्लोरल जॅकेट घातले आहे. पिवळ्या रंगाची ही फुलं दिसायला खूपच सुंदर दिसत आहेत
सईने यासह सैलसर पफ असणारी वेणी घातली आहे आणि तिच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला आलेल्या केसांच्या बटा चाहत्यांच्या काळजावर थेट वार करत आहेत
सईने यासह हातात गोल्डन स्टायलिश बांगड्या घातल्या असून कानात लहानशा रिंग्ज घातल्या आहेत. सईचा हा लुक सोबर आणि क्लासी दिसत आहे
सईने या ड्रेससह वेगवेगळ्या पोझ देत चाहत्यांचे मन जिंकून घेतले आहे
तर सईने आपल्या पोस्टमध्ये केसांना लावलेल्या खास बो बाबत लिहिले असून हा बो रिसायकल करण्यात आल्याचेही सांगितले आहे
नो मेकअप लुकचा आधार घेत सईने आपल्या सौंदर्यात भर घातली आहे. सईचा हा लुक तुम्हीही सहजरित्या कॅरी करू शकता