'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याने गपचूप उरकला साखरपुडा, बायको आहे फेमस अभिनेत्री (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
'सावळ्याची जणू सावली' या चर्चेत असलेल्या मालिकेतील फेमस अभिनेत्याने नुकताच साखरपुडा उरकला आहे. त्यांची होणारी बायको देखील अभिनेत्री आहे.
'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतील सावलीचा भाऊ पोलीस इन्स्पेक्टर देवा म्हणजेच निषाद भोईरने साखरपुडा केला आहे. चाहत्यांसह ही बातमी अभिनेत्याने शेअर केली आहे.
छोटी मालकीण, पुण्यश्लोक अहिल्याबाई सारख्या फेमस मालिकांची नायिका अभिनेत्री एतशा संझगिरी ही अभिनेता निषाद भोईर होणारी बायको आहे. या दोघांनी साखरपूडा केला आहे.
निषाद आणि एतशा हे अनेक दिवस एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे रोमँटीक फोटो देखील त्यांनी अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अखेर आता त्यांनी साखरपुडा करून चाहत्यांना चकीत केले आहे.
जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत निषाद आणि एतशाचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. लवकरच हे जोडपं आता लग्नबंधनात अडकणार आहेत.
साखरपुड्यात निषादने गुडघ्यावर बसून एतशाला रिंगा घातली. दोघांनी रोमँटीक डान्सही केला. त्यांचे फोटो पाहून कलाकारांसह त्यांचे चाहते देखील अभिनंदन करत आहेत.