वैज्ञानिकांच्या हाती लागली 'बुक ऑफ द डेड'! 3,500 वर्षांपासून दफन केलं होत... इजिप्शियन लोकांच्या मृत्यूनंतरच ते सत्य उलगडणार
हे पुस्तक प्रचीन इजिप्शियन ग्रंथांचा संग्रह असल्याचे म्हटले जात आहे. यात जीवन आणि आत्म्याच्या मार्गदर्शनासंबंधित काही गोष्टी लिहिल्या आहेत
हे पुस्तक ४३ फूट लांबीच्या पेपिरस स्क्रोलवर लिहिलेले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांनी वर्णन करताना हा एक अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वाचा शोध असल्याचे म्हटले आहे.
हे पुस्तक सामान्यतः थडग्यात ठेवले जात असे आणि मृतासोबत दफन केले जात असे. असे केल्याने मृताला मृत्युनंतरच्या जीवनात मदत मिळते, असा विश्वास होता
या पुस्तकात नक्कीच इजिप्तशियन लोकांच्या मृत्यूनंतरच्या विधिंविषयी लिहिले असतील. मध्य इजिप्तमध्ये ३,५०० वर्ष जुनी स्मशानभूमी सापडली आहे, ज्यात ताबीज, पुतळे, ममी, आणि कॅनोपिक जारसह ४३ फूट लांबीचा पॅपिरस स्क्रोल चांगल्या स्थितीत सापडला आहे
या स्माशानभूमीबद्दल, इजिप्तच्या सर्वाेच्च पुरातन वास्तू परिषदेचे सरचिटणीस मुस्तफा वझिरी यांनी सांगितले की, ते १५५० ईसापूर्व ते १०७० ईसापूर्व दरम्यानचे आहे. 'बुक ऑफ द डेड'ची लांबी ४३-४९ फीड असल्याचे मानले जात आहे