महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथे उमटलेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे, पाण्यातून आहे जाण्याचा मार्ग
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग नावाचा किल्ला उभारण्यात आला आहे जिथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे दिसतील. हा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात 300 हुन अधिक किल्ले बांधले. यातीलच एक म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा नौदल तळ होता
सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला म्हणूनच या किल्ल्याला सिंधुदुर्ग नाव देण्यात आले. या किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या काळातील दगडी विहिरी आहेत
महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटावर दोन देवळ्या आहेत. यांपैकी एका देवळीत महाराजांच्या डाव्या पायाचा व दुसरीमध्ये उजव्या हाताचा ठसा आहे
या किल्ल्यावर एक शिवराजेश्वर नावाचे मंदिर देखील आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची पदचिन्हे ठेवण्यात आली आहेत. किल्ल्याला तब्बल 42 बुरुज असून हा किल्ला मुंबईपासून 450 किमी अंतरावर आहे