गणेशोत्सवासाठी कोहिनूर टॉवर आणि शिवसेना भवनाचा देखावा
वरळीतील अभिषेक बडे या युवकाने गणेशोत्सवासाठी आकर्षक देखावा तयार केला आहे. या देखाव्यामध्ये एका बाजूला कोहिनूर टॉवर तर एका बाजूला शिवसेना भवनाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. शिवसेना भवनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमाही या देखाव्यामध्ये दाखवण्यात आली आहे.